स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )
लातूर : लातूर शहरातील अवैध धंदे तसेच बेकायदेशीर औषध विक्रीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये लातूर पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इकबाल चौक परिसरात कारवाई करत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विना परवाना Mephentermine Sulphate Injection IP (Termiva) या औषधाची बेकायदेशीर विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोन इसमांना ताब्यात घेतले. या कारवाईत 13 बॉटल इंजेक्शन व विक्रीसाठी वापरलेली सुझुकी स्कूटी असा एकूण 84,069/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशावर, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बावकर यांच्या नेतृत्वातील पथकाने शरीरास घातक असणारे Mephentermine Sulphate Injection IP (Termiva) हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विना परवाना विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगलेल्या दोघांना इकबाल चौक, लातूर येथे 16.00 वाजता संशयित स्कूटीसह दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची नावे

(1) मदनशहा ऊर्फ अदील निसार सय्यद, वय 21 वर्षे, रा. इकबाल चौक, मळवटी रोड, लातूर l.
(2) देवानंद रोहिदास सूर्यवंशी, वय 26 वर्षे, रा. इकबाल चौक, मळवटी रोड, लातूर
अशी आहेत. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील सुझुकी स्कूटीची झडती घेतली असता डिग्गीमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत Mephentermine Sulphate Injection IP (Termiva) 30 MG/10 ML च्या 13 बॉटल आढळून आल्या. या औषधांची एकूण किंमत 4,069/-, तर औषध विक्रीसाठी वापरलेली MH-24-BC-2700 क्रमांकाची सुझुकी स्कूटी अंदाजे 80,000/- किमतीची असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. संबंधित निरीक्षकांनी घटनास्थळी उपस्थित राहून जप्त औषधांपैकी 2 बॉटल नमुना तपासणीसाठी घेतल्या असून उर्वरित 11 बॉटल ताब्यात घेतल्या.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध कलम 123, 125, 278 भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील
सपोनि पांडुरंग माने, पोउपनि राजाभाऊ घाडगे, अमर केंद्रे, पोलीस अंमलदार युवराज गिरी प्रदीप स्वामी, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे, काकासाहेब बोचरे, संतोष खांडेकर यांनी ही कारवाई केली.
लातूर पोलिसांकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई सुरू राहणार असून, अशा प्रकारची संशयास्पद औषध विक्री आढळल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
