नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )

मो.नं. :  70281 92140

दौंड ( केडगाव ) दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका 20 वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 574/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 109, 118(2), 352, 351(2)(3) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्रभुद्ध उर्फ विशाल नितीन अवधुते (वय 20, व्यवसाय – शिक्षण, रा. पिसेवस्ती, केडगाव, ता. दौंड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अजय अनिल भोसले, सुजल अनिल भोसले (दोघे रा. वाळेकर कासेसजवळ, केडगाव, ता. दौंड) तसेच अर्जुन आसवरे (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 जून 2026 रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास प्रभुद्ध अवधुते हे त्यांच्या एमएच-42-एडब्ल्यू-1841 क्रमांकाच्या दुचाकीवरून लालचंदनगर सोसायटीसमोरील ताज पान शॉप येथे पान घेण्यासाठी थांबले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले आणि जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली.

यानंतर आरोपींनी लाकडी हॉकी स्टिक, कोयता आणि लोखंडी रॉडच्या साहाय्याने फिर्यादीवर हल्ला चढवला. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले असून आरोपींनी त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या प्रकरणी यवत पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे फिरवली. सदर गुन्ह्यातील आरोपी अजय अनिल भोसले याला 12 जून 2026 रोजी अटक करण्यात आली. त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, दौंड यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 17 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक बालकृष्ण गाडेकर करीत असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. केडगाव परिसरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून जुन्या वादातून वाढत्या हिंसक घटनांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *