स्मिता बाबरे (  मुख्य संपादिका )

  लातूर शहरातील गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत बसवेश्वर कॉलेज परिसरात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीस गेल्याच्या घटनेचा गांधी चौक पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत चोरीस गेलेला एकूण १ लाख ३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

                   दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.३० वाजता फिर्यादी महिला बसवेश्वर कॉलेज, परिसरात अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केले. यामध्ये ५.६५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट व ०.२५० ग्रॅम वजनाची सोन्याची बुगडी, असा एकूण १,०३,००० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला. याप्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५८४/२०२६, कलम ३०३(२) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

                    उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंग साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला सूचना दिल्या. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय बातमीदारांचे जाळे आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

                   तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे

१)सारिका दगडू काळे (वय ३६ वर्षे, रा. विलास नगर, लातूर)

                    हिला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे लॉकेट व सोन्याची बुगडी, असा एकूण १ लाख ३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
                       ही उल्लेखनीय कामगिरी  उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंग साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, सफौ राजेंद्र टेकाळे, पोलीस अंमलदार राम गवारे, संतोष गिरी, सचिन चंद्रपाटले, शिवा भादुळे, गोविंद राठोड, महादेव फुले तसेच महिला पोलीस अंमलदार ज्योती चौधरी यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed