नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर महाराष्ट्र राज्य )
मो.नं. : 70281 92140
पुणे ग्रामीण जिल्ह्यातील एक महत्त्वाचा गुन्हा अखेर न्यायालयीन प्रक्रियेनंतर निकाली निघाला असून, बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत कठोर शिक्षा सुनावली आहे.
दि. १० एप्रिल २०२६ रोजी बारामती येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश मा. एच. ए. वाणी यांच्या न्यायालयात हा निकाल जाहीर करण्यात आला. यवत पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल असलेल्या गुन्हा रजि. नं. 709/2019 (भा.दं.वि. कलम 353, 323, 504, 506) या प्रकरणात न्यायालयाने आरोपी यशवंत उर्फ रामा पोपट भागवत (वय 41, रा. पाटस, ता. दौंड, जि. पुणे) याला दोषी ठरवले.
या प्रकरणात आरोपीने शासकीय कामात अडथळा निर्माण करून पोलिसांवर हल्ला केल्याचे सिद्ध झाले. यामुळे न्यायालयाने भादंवि कलम 353 अंतर्गत आरोपीस २ वर्षांची सक्त कारावासाची शिक्षा व ₹5000 दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.
या खटल्यात तपास अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक आर. एम. घाडगे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, तर सरकारी बाजू प्रभावीपणे मांडत सरकारी अभियोक्ता मा. विकास घनवट यांनी युक्तिवाद केला.
या संपूर्ण कारवाईत यवत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने काम केले. तसेच कोर्ट कामकाजात पोलीस हवालदार व्ही. टी. ढोपरे, तसेच सेशन कोर्ट पैरवी अंमलदार G PSI कसपटे सर व ASI कवडे सर, आणि जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी PI संतोष घोळवे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात कायदा कठोर असल्याचा संदेश या निकालातून पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.
