संजयकुमार मुरूमकर

बीड : दिनांक 29/7/2026 शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे हायस्कूल बीड  प्रयास फाउंडेशन मुंबई यांच्या सहकार्याने गुरु आनंद महिला प्रतिष्ठान बीड तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक डॉ. मुरूमकर एस.डी. हे होते.

आयोजक सौ. सीमा मनोज ओस्तवाल [ अध्यक्ष गुरु आनंद महिला प्रतिष्ठान ] या होत्या तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री. शितल कुमार बल्लाळ [ पोलीस निरीक्षक शिवाजीनगर बीड ] श्री. आशपाक ईनामदार शेख [नगरसेवक बीड]  श्री. अज्ञान खान [दैनिक किसान कार्यकारी संपादक] श्री. संतोष वारे,  श्री. साहस आदोडे [ दैनिक सरकार संपादक] या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गोरगरीब सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. मुंढे सर,  श्री. मोराळे सर , श्री. कुवर सर , श्री. किशोर सर  श्रीम. आव्हाड मॅडम , श्रीम. जावळे मॅडम उपस्थित होते. या कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर यांचे सहकार्य खूप लाभले.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रास्ताविक श्रीम. मुंडे मॅडम यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन श्री. तांदळे सर यांनी केले. कार्यक्रम खूप खूप छान झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *