धनंजय काळे  ( महाराष्ट्र प्रतिनिधी )

दौंड (पुणे): दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतातील कृषी पंपांच्या केबल चोरणाऱ्या एका सराईत आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीकडून चोरी गेलेला तांब्याच्या केबलचा संपूर्ण १०० टक्के मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

घटनेचा तपशील:
दिनांक ०८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४:०० ते ०९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजण्याच्या दरम्यान मौजे नाथाचीवाडी (ता. दौंड, जि. पुणे) येथील मातोबा तलाव परिसरातून सुमारे २० शेतकऱ्यांच्या मोटार पंपांच्या तांब्याच्या केबल अज्ञात चोराने कापून नेल्या होत्या. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात ३ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

अशी झाली कारवाई:
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तपास पथक तयार केले. परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि गोपनीय बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मनोज गुलाब बिंद (वय ३७ वर्षे, मूळ रा. बरैनी बारीपूर, ता. कछुआ, जि. मिर्झापूर, उत्तर प्रदेश; सध्या रा. तानाजी शेवाळे यांच्या खोलीत, मांजरी फार्म, ता. हवेली, जि. पुणे) याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने या तिन्ही गुन्ह्यांची कबुली दिली.

जप्त केलेला मुद्देमाल:
तांब्याची केबल: १,१५,०००/- रुपये किमतीची कृषी पंपांची केबल
वाहन: गुन्ह्यात वापरलेली ५०,०००/- रुपये किमतीची मोटारसायकल
एकूण जप्ती: १,६५,०००/- रुपयांचा मुद्देमाल (दाखल गुन्ह्यांतील १००% मुद्देमाल जप्त)
तपास पथक:
ही यशस्वी कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष ताstagावकर, पोलीस उपनिरीक्षक मारोती मेकलवाड, पोलीस हवालदार संदीप देवकर, रॉकी देवकाते, महेंद्र चांदणे, पोलीस कॉन्स्टेबल धिरज जाधव, मारुती बायते, प्रतिक जगताप, अमोल भुजबळ, सचिन गुंड, दिनेश लोणकर व विनीत कुऱ्हाडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed