स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )
कळंब : कळंब शहरात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर कळंब पोलिसांनी अचानक छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत ६ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, रोख २२ हजार ७० रुपये तसेच जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील शेख व त्यांच्या पथकाने, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कळंब शहरातील तहसीलदार बाबा दर्ग्याजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैध जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी पाळत ठेवून सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास अचानक छापा टाकला.
हा जुगार प्रशांत जाधव यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले. पोलिसांनी छापा टाकल्यानंतर जुगार खेळणाऱ्या ६ आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २२,०७० रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे कळंब शहरात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अवैध जुगारामुळे सामाजिक व आर्थिक नुकसान होत असल्याने अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू ठेवण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेख, सहायक पोलीस निरीक्षक बजबळकर, पोलीस उपनिरीक्षक पठाण, तसेच पोहेकॉ/९५२ राहिज, पोना/१४६५ पोळ, पोकॉ/८३२ खाडे, पोका/१८१४ अश्मोडे आणि पोका/१८३२ माळी यांच्या पथकाने सहभाग घेतला.
जप्त मुद्देमाल :
रोख रक्कम – ₹२२,०७०
जुगाराचे साहित्य
एकूण ६ आरोपी ताब्यात
या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई कळंब पोलिसांकडून करण्यात येत आहे.
