स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )

लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दि. 01ऑगस्ट 2026 पासून राबविण्यात येत असलेल्या ‘पोलीस-विद्यार्थी संवाद’ उपक्रमास विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत दि. 10 ऑगस्ट 2026 रोजी जिल्ह्यातील 10 शाळा-महाविद्यालयांना भेट देऊन एकूण 2690 विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला.



                   विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करणे, व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देणे, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे आणि पोलिसांविषयी विश्वास दृढ करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.



संवादादरम्यान विद्यार्थ्यांना ‘नशामुक्त भारत’ अभियान, नवीन फौजदारी कायदे, सायबर सुरक्षा व सायबर फसवणूक प्रतिबंध, एनडीपीएस कायदा, पॉक्सो कायदा, वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट व सीटबेल्ट वापरण्याचे महत्त्व, तसेच सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना पोलीस अधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरे देत त्यांना कायद्याचे पालन करणारा जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन केले.



                    दि. 10 ऑगस्ट रोजी विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खालीलप्रमाणे मार्गदर्शन करण्यात आले—

पोलीस स्टेशन औराद शहाजनी  हद्दीत पोउपनि. श्री. काळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
पोलीस स्टेशन निलंगा हद्दीती महाराष्ट्र विद्यालय, निलंगा येथे सपोनी . श्री. खापरे यांनी मार्गदर्शन केले.
पोलीस स्टेशन कासार शिरशी हद्दीतील महाराष्ट्र विद्यालय, निंबाळा  येथे सपोनि. श्री. गर्जे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.


पोलीस स्टेशन उदगीर शहर हद्दीतील सरदार वल्लभ भाई पटेल माध्यमिक शाळा , उदगीर येथे सोपोनी . श्री. कारवार यांनी मार्गदर्शन केले.
पोलीस स्टेशन MIDC हद्दीत श्री विद्या विकास माध्यमिक विद्यालय येथे  पोउपनि. श्री पोगुलवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.


पोलीस स्टेशन रेणापूर  हद्दीतील शिवाजी महाविद्यालय  येथे पोनि. श्री. देडे  यांनी मार्गदर्शन केले.
पोलीस स्टेशन गांधी चौक ट्विंकल इंग्लिश स्कूल येथे पोउपनि. श्री. सोनकांबळे  यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
पोलीस स्टेशन शिवाजी नगर हद्दीमध्ये अल्फा 360 कोचिंग क्लासेस येथे पोलीस निरीक्षक श्री पाटील यांनी मार्गदर्शन केले.
पोलीस स्टेशन वाढवणा हद्दीमध्ये शाहू विद्यालय शेळगाव येथे पोलीस हवालदार औरंगाबाद यांनी मार्गदर्शन केले



                  या उपक्रमाचा पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे हे नियमित आढावा घेत असून, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोलीस प्रशासनाचा सकारात्मक संदेश पोहोचावा, विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबद्दल आदर निर्माण व्हावा, व्यसनमुक्त, सायबर सुरक्षित आणि जबाबदार नागरिक घडावेत यासाठी हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. ‘पोलीस-विद्यार्थी संवाद’ हा उपक्रम आगामी काळातही जिल्ह्यातील अधिकाधिक शाळा व महाविद्यालयांमध्ये सातत्याने राबविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *